वाडेगव्हाणला बोकड, दुचाकी पळवली

वाडेगव्हाणला बोकड, दुचाकी पळवली

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील वाडेगव्हाण येथील शेळके मळा परिसरात चोरट्यांनी एक जुनी मोटारसायकल व बोकड पळवल्याची घटना सोमवारी (दि.31) रात्री घडली आहे. याबाबत राजेंद्र मार्तंड शेळके (रा.शेळके मळा, वाडेगव्हाण ता.पारनेर) यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान आज्ञात चोरांनी त्यांची 10 हजार रुपये किंमतीची जुनी हिरो होंडा कंपनीची स्प्लेन्डर प्लस मोटारसायकल व त्यांच्या शेजारी राहणारे सुभाष सुखदेव भोसले यांचा 10 हजार रुपये किंमतीचा एक वर्षे वयाचा बोकड अज्ञात चोरांनी चोरून नेला. सुपा पोलिसांनी राजेंद्र शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. इ. पठाण पुढील तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वाडेगव्हाण येथून म्हैस चोरीचा प्रयत्न झाला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com