वडाळा महादेव येथे विजेच्या रोहित्राची चोरी

वडाळा महादेव येथे विजेच्या रोहित्राची चोरी

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील हरेगाव शेतमळा परीसरातील वडाळा महादेव हद्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी 100 केव्ही रोहित्र खोलुन खाली टाकले व त्यातील ऑईल चोरुन नेले आहे.

याच रोहित्रावर परीसरातील अनेक शेतकर्‍याच्या विद्युत मोटारींचे कनेक्शन आहेत. सध्या लोड शेडींगचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी शेतकरी आपले पिके जगविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये रोहित्र चोरीची समस्या म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. परीसरात मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट निर्माण झाली हसुन पिकांबरोबर जनावरे, शेतकरी हैराण झाले आहे. सुदैवाने रोहित्र जागेवरच सापडले आहे.

या घटनेची माहीती शेतकर्‍यांनी महावितरण अधिकारी कर्मचारी यांना दिल्यानंतर महावितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता रोहित्रीमधील ऑईल गायब झाले असल्याचे माहिती मिळाली. यावेळी सदर विभागाचे कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली. यावरून लवकरात लवकर रोहित्र बसविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात येणार असल्याची माहीती मिळाली.

यासंदर्भांत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसलेबाबत माहिती मिळाली. सध्या याच परीसरातून स्प्रिंकलर गायब झाले आहे. तसेच नेवासा रोडवरून चोरट्यांनी गोदाम फोडुन सोयाबीनवर डल्ला मारला आहे. परीसरात भुरट्या चोरांबरोबर अट्टल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. सदर चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ शेतकरी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com