वडाळा महादेव परिसरात कुत्र्यांच्या हल्यात हरणाचे पाडस जखमी

नागरिकांच्या सतर्कतेने पाडसाला मिळाले जिवदान
वडाळा महादेव परिसरात कुत्र्यांच्या हल्यात हरणाचे पाडस जखमी

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

हरणांच्या कळपावर हल्ला करणार्‍या कुत्र्यांच्या तावडीत हरणाचे पाडस सापडले. या हल्ल्यात पाडस जखमी झाले. मात्र नागरिकांनी कुत्र्यांंना हुसकावून लावत पाडसाला त्यांच्या तावडीतून बचावले.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव हरेगाव रोड कार्पोरेशन परिसरामध्ये हरणाचा कळप भटकंती करत असताना कळपातील काही हरणांवर कुत्र्यांनी अचानक हल्ला चढविला. यावेळी मोठी हरणे पलायन करण्यात यशस्वी झाले. परंतू छोटे पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले. या ठिकाणच्या वस्तीवरील नागरिकांनी हा प्रसंग पाहताच आरडा ओरड करत कुत्र्यांना तेथून हुसकावून लावले. त्याच्या, पाठीवर डोक्याला कुत्र्यांनी चावा घेतल्याने रक्त निघत होते. जखमी पाडस मोठमोठ्यांने विव्हळत होते. यावेळी नागरिकांनी पाडसावर प्रथमोपचार करत व प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती वनविभाग तसेच पोलीस प्रशासन यांना कळविली.

त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक किरण पवार, पो. कॉ. प्रवीण कांबळे, राजेंद्र देसाई, गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी येवून जखमी पाडसावर उपचार करून वनविभागाच्या स्वाधीन करावे, अशी सूचना पोलीस नाईक किरण पवार यांनी केली.

याप्रसंगी अमोल सुलताने, सुभाष सुलताने, किरण शेळके, मेजर रविंद्र सुलताने, विनायक सुलताने, बाळासाहेब सुलताने, देवांश सुलताने, विशाल सुलताने उपस्थित होते. औषधोपचार पूर्ण होताच जखमी पाडसाला वनाधिकारी यांच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती अमोल सुलताने यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com