टँकरचा टायर फुटला, छोटा हत्ती उलटला तर दुचाकी टँकरवर धडकली

अपघात | Accident
अपघात | Accident

वडाळा महादेव |वार्ताहार| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील तैयब्वजी फार्म हाऊस नेवासा रोडवर झालेल्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

दुधाच्या टँकरचा टायर फुटल्याचा आवाज येताच मालवाहतूक करणारा छोटा हत्ती (क्र. एम एच 14 डी एम 6898) हुल बसल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये उलटला तर त्यामागील असलेला दुचाकीस्वार (क्र.एम एच 17 सी बी 2722) टँकरला धडकला. या अपघातात दुचाकीवरील तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्याला श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रानी सांगितले.

याबाबतची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांनी देण्यात आली. माहिती मिळाच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो. ना. किरण पवार, मच्छिंद्र शेलार पो. कॉ . प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत करून रस्त्याचा कडेला उलटलेला टेम्पो नागरिकांच्या मदतीने सरळ केला मात्र टायर फुटलेला टँकर चालक या ठिकाणावरून पळून गेला. एक ते दीड किलोमीटर अंतरावर पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

या अपघातात ठार झालेला तरुण हा परिसरातील असून माथाडी कामगार असल्याची माहिती मिळाली आहे सदरचा दुधाचा टँकर (क्र. एम एच 11 ए एल 5869) हा पाथर्डी तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com