वडाळा महादेवजवळ अपघातात एक ठार; दोघे जखमी

वडाळा महादेवजवळ अपघातात एक ठार; दोघे जखमी

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरातील धार्मिक आश्रमालगत असलेल्या चारीजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल. जखमी गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील असल्याचे समजते.

याबाबत माहिती अशी की, सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान महांकाळवाडगाव येथून आलेला उसाचा ट्रॅक्टर रस्त्याच्या एका बाजूने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या बोलेरो वाहनाने (एमएच 17 एजी 9093) कट मारुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुकाला अडकला यावेळी पाठीमागून दुचाकीवरुन (एमएच 17 सीएस 5724) येणारा शिरसगाव येथील विकी दौड हा व्यक्ती आदळला. त्यात त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

यावेळी दुसर्‍या दुचाकी वाहनावरील (एमएच 17 सीसी 6222) दोघेही अपघातात जखमी झाले सदरचे दोघे हे नेवरगाव येथील असल्याची माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी भीषण अपघातामध्ये शिरसगाव परिसरातील निवृत्त पोलीस अधिकारी यांचाही याच ठिकाणी अपघात झाला होता ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने तसेच परिसरात गतिरोधक नसल्याने नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज हरेगाव फाटा अशोक नगर फाटा धार्मिक आश्रम वडाळा महादेव बस स्टॅन्ड या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत.

पोलीस हवालदार संतोष परदेशी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कांबळे गृहरक्षक दलाचे चंद्रकांत मोरकर, राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत करत शिरसगाव येथील जखमी विकी दौंड यांना व इतर दोघे यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी हलविण्यात आले. उपचार दरम्यान वैद्यकीय सुत्राकडून सदरचा इसम मयत असल्याची माहिती मिळाली. मयत दौंड हा परिसरातील असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदरचा बोलेरो वाहनचालक वाहन सोडून पसार झाला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com