वडाळाबहिरोबा येथे घरफोडी; गुन्हा दाखल

वडाळाबहिरोबा येथे घरफोडी; गुन्हा दाखल

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील वडाळा बहिरोेबा (Vadala Bahiroba) येथील बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी टीव्ही, एक तोळा सोन्याचे दागिने, मोटारसायकल आदी वस्तू चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात (Shanisignapur) घरफोडीचा गुन्हा दाखल (Burglary case filed) झाला आहे.

याबाबत गणेश तुकाराम बडगू (वय 47) धंदा नोकरी रा. वडाळा बहिरोबा (Vadala Bahiroba) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी स्वतः गंगापूर (Gangapur) जि. औरंगाबाद (Aurangabad) येथील शाळेत शिक्षक (Teacher) म्हणून नोकरी करतो. पत्नी आजारी असल्याने नगरला (Nagar) उपचारासाठी अ‍ॅडमिट होती. मुलगा अथर्व (वय 15) हा घराला कुलूप लावून नगरला त्याच्या आईकडे हॉस्पिटलला गेलेला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी शेजारी राहणारे राजेंद्र झावरे यांनी फोनवरून सांगितले की, तुमचे घर उघडे दिसत आहे. मी व मुलगा घरी आलो असता दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेले दिसले.

घरात जाऊून पाहिले असता वनप्लस कंपनीचा एलईडी टीव्ही अंदाजे किंमत 12 हजार रुपये, कपाटात ठेवलेले 8 ग्रॅमचे सोन्याचे मनीमंगळसूत्र, अडीच ग्रॅमची कर्णफुले, चांदीच्या तीन छोट्या लक्ष्मीच्या मूर्ती, चांदीचा ग्लास व चमचा, इंटेक्स कंपनीचे होमथिएटर व डिस्कव्हर कंपनीची मोटारसायकल (एमएच 17 एके 2049) चोरीस गेल्याचे दिसून आले.

या फिर्यादीवरून शिंगणापूर पोलिसांनी (Shingnapur) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 98/2021 भारतीय दंड विधान कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com