लस, चाचणीच्या नावाखाली नगरकर सुसाट

लस, चाचणीच्या नावाखाली नगरकर सुसाट
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना साखळी तोडण्यासाठी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी रविवारी मध्यरात्रीपासून नगर शहरात कडक लॉकडाऊन केला असला तरी रस्त्यावरील गर्दी काही कमी झाली नसल्याचे चित्र सोमवारी सकाळपासून दिसून आले. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी लसीकरण, करोना चाचणी आणि हॉस्पिटलचे कारण देत नगरकर रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. विनाकारण फिरणार्‍यांचे वाहन जप्त करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

रविवारी मध्यरात्रीपासून शहरात कडक लॉकडाऊनला सुरूवात झाली. सोमवारी सकाळी किराणा दुकान, भाजीपाला विक्री पूर्णत: बंद असल्याचे दिसून आले. मार्केट बंद असले तरी नगरकर दुचाकीवरून सुसाट फिरत असल्याचे दिसून आले.

शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातही रस्त्यावर गाड्या फिरत होत्या. चौकात पोलीस नसल्याने रस्त्यावर गाड्यांचा रांगा लागल्या आहेत. लस घेण्यासाठी जातोय, करोना टेस्टसाठी जातोय तर कोणी हॉस्पिटलचे कारण पुढे करत घराबाहेर पडत आहेत. आयुक्तांनी घोषित केलेले लॉकडाऊन यामुळे कागदोपत्रीच राहते की काय? अशी शंका आता निर्माण झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com