आजपासून मुलांचे लसीकरण सुरू

आजपासून मुलांचे लसीकरण सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वैद्यकीय तज्ज्ञांच्या इशार्‍यानंतर आता प्राधान्याने 15 ते 18 वर्ष वयोगटातील 60.13 लाख मुलांना कोव्हॅक्सिनची लस टोचली जाणार आहे. त्याची सुरुवात आज सोमवार 3 जानेवारीपासून होत आहे. त्यासाठी 1 जानेवारीपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.

तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर, 60 वर्षावरील व्यक्ती व सहव्याधी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी लसीचा दुसरा डोस घेऊन किमान 39 आठवडे पूर्ण होणे गरजेचे आहे.

शाळा, महाविद्यालयांतच विद्यार्थ्यांना लस देण्याचे धोरण आहे. त्यानुसार श्रीरामपूरसह अन्य ठिकाणी नियोजनही करण्यात आले आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि शाळा/कॉलेज चे आयडेंटिटी कार्ड लागणार आहे.

करोनाच्या तिसर्‍या लाटेत 15 वर्षांवरील मुलांना धोका होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आजपासून लस टोचली जात आहे. कोव्हिशिल्ड लस दिल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो तर कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनी देता येतो. या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com