चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रातही आता लसीकरण

चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रातही आता लसीकरण

चांदा (वार्ताहर) - नेवासा तालुक्यातील चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या उपकेंद्रांतूनही आता करोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रजनिकांत पुंड यांनी दिली.

या केंद्राअंतर्गत एकूण 16 गावे येतात.आतापर्यंत या सर्व गावातील नागरीकांना लसीकरणासाठी चांद्याला यावे लागत असे.लसींची उपलब्धता कमी होत असल्याने आपला नंबर लवकर लागावा यासाठी नागरीक पहाटे पाचपासूनच रांगा लावत असत नागरीकांची होणारी गर्दी ही धोक्याची असल्याने तसेच नंबरसाठी अनेकदा होणारे वादविवाद टाळण्यासाठी डॉक्टर्स, अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. पुंड यांनी सांगितले.

त्यानुसार आता जसजशा लस उपलब्ध होतील तसतसे नियोजन करून बर्‍हाणपूर, कौठा, माका, शिंगवे तुकाई आदी ठिकाणाहून आता नागरिकांना लस मिळणार असल्याने एकाच ठिकाणी होणारी गर्दी कमी होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com