श्रीरामपुरातील केंद्रावर पहिल्याच दिवशी टोकन पध्दतीमुळे लसीकरण सुरळीत

श्रीरामपुरातील केंद्रावर पहिल्याच दिवशी  टोकन पध्दतीमुळे लसीकरण सुरळीत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - लसीकरण करण्यासाठी श्रीरामपूर शहरातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालय खूपच गैरसोयीचे होत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाऐवजी मेनरोडवरील आझाद मैदानावर कालपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. काल पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र टोकन पध्दत राबविल्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता लसीकरण हे सुरळीत पार पडले.

शहरातील नागरिकांच्या सोयीमुळे शहरातील मेनरोडवरील आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयात लसीकरण केंद्र सुरु होणार असल्याची माहिती शहरभर पसरली. आपला नंबर लागावा म्हणून नागरिकांनी काल पहाटे साडेपाच वाजेपासूनच नंबर लावण्यास सुरुवात केली होती. लस फक्त 300 जणांची आली होती. मात्र 1000 जण रांग लावून उभे होते. मात्र 300 लोकांनाच टोकन दिले जाईल उर्वरीत लोकांना उद्या दिली जाईल असे जाहीर केल्यामुळे सकाळी 9 ते 1 च्या दरम्यान 150 तर दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 150 असे 300 टोकन देवून लसीकरण करण्यात आले. यात कोणत्याही प्रकारचा वशिला अथवा कोणाचीही शिफारस ग्राह्य न धरल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.

काल शहरातील करोना लसीकरण केंद्राचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी मोठी रांग व एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक लस घेण्यासाठी आल्याने लसीकरण केंद्राच्या कर्मचार्‍यांची सुरुवातीला मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. मात्र नगरपालिका व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने चांगले नियोजन केल्यामुळे लसीकरण सुरळीत पार पडले.

या लसीकरण करण्याची नियोजन ग्रामीण रुग्णालयाचे प्र. अधिक्षक डॉ. योगेश बंड, प्रसन्न धुमाळ तसेच तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले.

दुपारच्या भर उन्हात पाणी विना बसावे लागते

श्रीरामपूर शहरात लसीकरण केंद्र सुरु झाले असले तरी वाचनालयाच्या बाहेर टोकन दिल्यानंतर पुन्हा त्यांना खाली वाळूत बसवले जाते. लसीकरणाची वेळ ही सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत असते. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि सध्या 40 अंश ग्रेडचे तापमान असल्यामुळे वाळू तापली जाते. अशा भर उन्हा वयोवृध्द पुरुष व महिलांना बसावे लागते. त्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. लसीकरणासाठी किती वेळ लागेल हे कोणालाच सांगता येत नसल्यामुळे तासन तास या ठिकाणी बसावे लागत आहे. त्यांची ही गैरसोय दूूर होण्यासाठी त्या पटांगणात सावली करावी तसेच त्यांना बसण्यासाठी खुर्च्याचा बंदोबस्तासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच शक्यतो वयोवृध्द 70 वयाच्या पुढील लोकांना घरीच लस देण्याची पध्दत सुरु केली तर वयोवृध्दांचा मोठा त्रास वाचला जाईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com