अहमदनगर : आज 2100 जणांना टोचली लस

महापालिका केंद्रावर गर्दी
अहमदनगर : आज 2100 जणांना टोचली लस

अहमदनगर (प्रतिनिधी) - दोन दिवसाच्या ब्रेकनंतर आज गुरूवारी नगर शहरातील 2100 जणांना कोरोनाची लस देण्यात आली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन अशा दोन्ही प्रकारच्या लस महापालिकेच्या केंद्रावर उपलब्ध होत्या. लस मिळेल की नाही या भितीने नगरकरांना आजही लस घेण्याला गर्दी केली.

नगर शहरात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लस टंचाईअभावी बंद आहे. 45 च्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असून लस टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. नगर शहरातील लसीकरण केंद्र लस नसल्याने तीन दिवस बंद होते.

आज गुरूवारी नगर शहरासाठी जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला 2100 डोस देण्यात आले. त्यामुळे आज सगळ्याच आरोग्य केंद्रावर लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. तरीही लस मिळेल की नाही या शंकेने केंद्राबाहेर गर्दी झाल्याचे दिसून आले.

उपकेंद्रांना 900 डोस

नगर शहरात महापालिकेचे माळीवाडा, भोसले आखाडा, मुकुंदनगर, केडगाव, सावेडी, नागापूर आणि तोफखाना येथील आरोग्य केंद्रातून लसीकरण सुरू आहे. याशिवाय नगरसेवकांच्या मागणीनुसार 16 उपकेंद्र सुरू करत तेथेही लसीकरण सुरू करण्यात आले आहेत. आज महापालिकेच्या सात केंद्रांना 1200 तर उपकेंद्रांना 900 लसीचे डोस देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com