पहिल्याच दिवशी 5 हजार लसीकरण

पहिल्याच दिवशी 5 हजार लसीकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

45 वर्षावरील नागरिकांना सरसकट लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर काल पहिल्याच दिवशी

जिल्ह्यातील 5 हजार 83 जणांनी करोनाची लस टोचून घेतली. काल दिवसभरात जिल्ह्यातील 165 लसीकरण केंद्रात 11 हजार नागरिकांना करोनाची लस टोचण्यात आली.

करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 227 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, वयोवृध्द (60 वर्षावरील) आणि आता 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे.

काल दिवसभरात जिल्ह्यातील 11 हजार नागरिकांना लस टोचण्यात आली. सर्वाधिक लस ही 45 ते 60 वयोगटातील नागरिकांनी घेतली. 5 हजार 83 जणांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला, तर 43 जणांनी दुसरा डोस घेतला. 257 आरोग्य कर्मचार्‍यांनी काल करोनाचा पहिला तर 231 कर्मचार्‍यांनी करोनाची दुसरी लस टोचून घेतली.

फ्रंट लाईन वर्कर असणार्‍या 631 जणांनी पहिला तर 220 जणांनी काल करोनाचा दुसरा डोस घेतला. 60 वर्षावरील 4 हजार 260 ज्येष्ठ नागरिकांनी करोनाची काल पहिली लस घेतली तर 266 वृध्दांनी काल दिवसभरात दुसरा डोस घेतला.

करोनाचा संसर्ग वाढत असला तरी तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 165 केंद्रावर तर नगर शहरातील 8 केंद्र आणि सिव्हील हॉस्पिटलमध्ये करोना लसीकरण केंद्रावर लस टोचली जात आहे.

अबतक 1 लाख 95 हजार

आतापर्यंत जिह्यातील 1 लाख 95 हजार 227 जणांना करोनाची लस टोचण्यात आली आहे. त्यातील सर्वाधिक लस ही ज्येष्ठ् नागरिकांनी घेतली असून 93 हजार 866 ज्येष्ठांना करोनाची लस टोचण्यात आली. 36 हजार 53 आरोग्य कर्मचार्‍यांना आतापर्यंत पहिला तर 19 हजार 265 आरोग्य कर्मचार्‍यांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. 14 हजार 857 फ्रंट लाईन वर्करनी पहिला तर 5 हजार 620 जणांनी दुसरा डोस घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com