लस घेण्याकरिता पहाटे 4 वाजता नागरिकांचा लसीकरण केंद्रावर गोंधळ!

लस घेण्याकरिता पहाटे 4 वाजता नागरिकांचा लसीकरण केंद्रावर गोंधळ!

राहाता |प्रतिनिधी| Rahata

लस घेण्याकरिता नागरिकांची पहाटे चार वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने करोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली असल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दररोज पहाटे रुग्णालयात घेऊन लसीकरणासाठी होणार्‍या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

सध्या तालुक्यात करोना आजाराने थैमान घातले आहे. यापासून आपला व कुटुंबाचा बचाव व्हावा म्हणून नागरिक लसीकरण केंद्रावर धाव घेताना दिसतात .परंतु लसीचा पुरवठा कमी असल्याने दररोज लस घेण्याकरिता जवळपास पाचशे नागरीक पहाटे 4 वाजेपासून शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी करतात. परंतु जितका साठा उपलब्ध आहे तेवढेच टोकन प्रथम रांगेत येणार्‍या नागरिकांना दिले जाते. परिणामी ज्यांना टोकन मिळाली नाही ते रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालतात. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना संपूर्ण दिवस काम करून दररोज पहाटे रुग्णालयात घेऊन लसीकरणासाठी होणार्‍या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

राहाता ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संजय उबाळे म्हणाले नागरिकांनी लस घेण्याकरिता पहाटे येण्याची गरज नाही. त्यासाठी सकाळी सात वाजता यावे रुग्णालयाने सुरू केलेल्या टोकण पद्धतीमुळे नागरिकांना त्रास होत नाही. या उपक्रमाचे राज्यात कौतुक होत आहे. या पद्धतीचे अनुकरण संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. राहाता तालुक्यात 52 हजार नागरिकांचे लसीकरण पहिला डोस साठी चाळीस हजार तर दुसर्‍या डोस साठी तेरा हजार नागरिकांचा सहभाग घेतला आहे.

लसीकरण प्रक्रियेत राजकीय पुढारी यांनी हस्तक्षेप करू नये. लस घेण्याकरिता स्थानिक नागरिकांना प्राधान्य दिले पाहिजे. बाहेर गावातील नागरिक रुग्णालयात येऊन गोंधळ घालतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो. लस पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने ती प्रत्येक नागरिकांना मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पहाटे येऊन गर्दी करु नये.

- डॉ. गोकुळ घोगरे वैद्यकीय अधिकारी, राहाता ग्रामीण रुग्णालय

मी को-व्हॅक्सिनचा पहिला डोस मार्च 25 तारखेला घेतला. दुसरा डोस घेण्याकरिता 20 दिवस जास्त झाले. पण अद्याप मिळाला डोस उपलब्ध झाला नाही. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता लस घेण्याकरिता रांगेत उभा होतो; परंतु फक्त 100 डोस शिल्लक होते व त्यासाठी 500 हून अधिक नागरिक उपस्थित असल्याने मला टोकन मिळाले नाही.

- शिवाजी भालेराव, लस लाभार्थी पिंपळस

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com