मराठा समाजाचा वापर केवळ मतांसाठीच - डॉ. आप्पासाहेब आहेर

मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी कदम
मराठा समाजाचा वापर केवळ मतांसाठीच - डॉ. आप्पासाहेब आहेर

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी मतांसाठी मराठा समाजाचा वापर करू घेत आहे. समाजाच्या न्याय हक्कासाठी, समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणताही राजकीय नेता पुढे येत नाही. यासाठी समाजाला एकत्रित करणे गरजेचे आहे.

युवकांच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्रित केले जाईल, मराठा समाजातील गोर-गरीब शेतकर्‍यांनची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यासाठी शैक्षणिक आरक्षण मिळणे गरजेचे आहे.त्यासाठीच भारतीय मराठा महासंघ समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका लढविणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब आहेर यांनी दिली.

भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सोपान कदम यांची निवड करण्यात आली. कदम यांना निवडीचे पत्र डॉ.आहेर, प्रदेशाध्यक्ष डॉ. बन्सी डोके, कार्याध्यक्ष रोहिनी राऊत, रंगनाथ लबडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, जिल्ह्यातील युवकांचे संघटन करून भारतीय मराठा महासंघाचे विचार मराठा समाजामध्ये घेऊन जाणार आहे. अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणार असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रश्‍न मार्गी लावण्यसासोबतच मराठा आरक्षणा संदर्भात विचार-विनिमय करून लढा उभा करणार आहे. यावेळी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यात जिल्हा उपाध्यक्षपदी सुदाम मुखेकर ,नगर शहराध्यक्षपदी विलास रोडे, नगर तालुका अध्यक्षपदी संतोष कंडेकर, पाथर्डी तालुका अध्यक्षपदी सुजित जगताप, शेवगाव तालुका अध्यक्षपदी दिगंबर डोके, नगर शहर महिला अध्यक्षपदी कमल जाधव, उपाध्यक्षपदी कल्पना गुंजाळ याची निवड करण्यात आली असल्याची माहिती दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com