घरगुती गॅसचा वापर रिक्षांसाठी

नालेगावच्या छाप्यात टाक्या, रिक्षा जप्त
घरगुती गॅसचा वापर रिक्षांसाठी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यावसायिक सिलेंडरमध्ये (Commercial Cylinder) घरगुती गॅस (Domestic Gas) भरला जात असल्याची बाब नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणली असतानाच घरगुती गॅसचा (Domestic Gas) वापर रिक्षासाठी (Riksha) होत असल्याचे पुरवठा विभागाने (Supply Department) उघडकीस आणले. नालेगाव येथे टाकलेल्या छाप्यात (Nalegav Raid) 37 घरगुती सिलिंडर, पाच रिक्षा, इंधन भरण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

याप्रकरणी पुरवठा निरीक्षक जयंत कान्हू भिंगारदिवे (रा. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून घरगुती गॅसचा काळाबाजार (Domestic Gas Black Market) करणारे निलेश गोंविद आरडे (रा. गरवारे चौक, नागापूर एमआयडीसी), विकास नारायण खोसे (रा. नागापूर एमआयडीसी) यांच्याविरोधात भादवि 285, 286, 34, 336 सह जिवनाश्यक वस्तू अधिनियम 1955 कलमान्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील वडगाव तांदळी येथे नगर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत घरगुती गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरत असल्याची बाब उघडकीस आणली. पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत घरगुती गॅस सिलिंडरमधून रिक्षामध्ये भरला जात असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे घरगुती गॅसचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची बाब लक्षात येते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. जे. महाजन करीत आहे.

Related Stories

No stories found.