अर्बन बँकेच्या लॉकरच्या चावीची चोरी

अर्बन बँकेच्या लॉकरच्या चावीची चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) दिल्लीगेट शाखेच्या लॉकरच्या चावीची चोरी (Locker key theft) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील कापडबाजारात (kapadbazar) ही घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात शर्मिला साळवे (वय 62, रा. एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवार 6 जुलै रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी साळवे या कापडबाजारात खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने साळवे यांची पर्स (Purse theft) चोरून नेली.

पर्समध्ये तीन हजार रुपयांची रोख रक्कम (Cash), एटीएम कार्ड (ATM Card), नगर अर्बन बँकेच्या दिल्लीगेट शाखेच्या लॉकरची चावी व आधारकार्ड असा 30 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. तो चोरीस गेला आहे. साळवे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com