अर्बन बँक फसवणूक प्रकरण; 'या' तीन डाॅक्टरांना अटक

पिंपरी चिंचवड पोलिसांची नगरमध्ये कारवाई
अर्बन बँक फसवणूक प्रकरण; 'या' तीन डाॅक्टरांना अटक
Picasa

अहमदनगर|Ahmedagar

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील फसवणूक प्रकरणात नगरच्या तीन डॉक्टरांना पिंपरी चिंचवड पोलिसंानी अटक केली. डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. भास्कर सिनारे असे अटक केलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांना शनिवारी चिंचवड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 30 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटी रूपयांच्या कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याने व्यवस्थापक महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण तसेच अभिजीत नाथा घुले (रा. बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बँकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील काहींना जमीन मंजूर झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना नगर येथील आशुतोष लांडगे याच्या नावावर 11 कोटी रूपये वर्ग झालेले होते, यात लांडगे याला पोलिसांनी अटक केली होती. त्याने पोलिसांसमोर तोंड उघडल्याने सदर फसवणूक प्रकरणात तीन डॉक्टरांची नावे समोर आली. या फसवणूक प्रकरणातील सुमारे सहा कोटी रूपयांची रक्कम डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असल्याचे निरीक्षक बाबर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com