अर्बन बँक निवडणुकीची घाई नको

केंद्रीय सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा
अर्बन बँक निवडणुकीची घाई नको
नगर अर्बन बँक

अहमदनगर l प्रतिनिधी l Ahmednagar

नगर अर्बन को ओप बँक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. मात्र निवडणुकीसाठी ही वेळ योग्य नाही.

प्रशासकास काही काळ मुदतवाढ द्यावी. बँकेची परिस्थिती आणि सध्याच्या करोना पार्श्वभूमीवर थोडी परिस्थिती सुधारल्यावरच निवडणूक घ्यावी, अशी मागणी नवनीत विचार मंचचे प्रमुख सुधीर मेहता यांनी केंद्रीय सहकार खात्याकडे केली.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना निवेदन पाठवले असून बँकेवर प्रशासक नेमल्यानंतरही बँकेची परिस्थिती आहे तशीच आहे. बँकेच्या ठेवी कमी आणि एनपीए प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सभासद ठेवीदारात अतिशय संभ्रमाचे वातावरण असून, बाजार पेठेत अतिशय प्रतिकुल वातावरण असल्याने त्याचा मोठा परिणाम बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे.

करोना काळात व्यवसाय पूर्णतः ठप्प झाल्याने त्याचाही मोठा परिणाम वसुलीवर झाला होता. आता व्यवहार सुरळीत होऊ लागले असल्याने प्रशासकासच काही काळ काम करु द्यावे. वसूली, ठेवी आणि , एनपीएची परीस्थिती सुधारल्यानंतर निवडणूक कार्यक्रम घेणे योग्य होइल, असे मेहता यानी सहकार खात्याला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.