लोकसेवा आयोग परीक्षेत बेलापूरचा अभिषेक दुधाळ देशात 637 वा
सार्वमत

लोकसेवा आयोग परीक्षेत बेलापूरचा अभिषेक दुधाळ देशात 637 वा

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

तालुक्यातील बेलापूर येथील एस. आर. के. इंग्लीश मिडीयम स्कूल व जे. टी. एस. हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचा माजी विद्यार्थी व डहाणुकर विद्यालयाचे शिक्षक दिलीप दुधाळ यांचा चिरंजीव अभिषेक दुधाळ राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी)परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याने देशात 637 वा क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अभिषेकचे इयत्ता 4 थी पर्यंत प्राथमिक शिक्षण बेलापूर शिक्षण संस्थेच्या शेठ रामधनजी खटोड इंग्लीश मीडियम स्कुलमध्ये तर 10 वी ते 12 वी माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण जे. टी. एस. हायस्कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केले.

त्यांनतर त्याने मुंबई येथील व्ही.जे.आय.टी मध्ये बी. टेक पूर्ण केले. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असा निधार करून त्याने दिल्लीतील जेएनयू विद्यापिठात एम.ए.अर्थशास्त्र शाखेला प्रवेश घेतला. तेथेच त्याने परीक्षेसाठी क्लासही केले.

2019 मध्ये त्याने राष्ट्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल काल मंगळवार दि. 4 ऑगष्ट रोजी लागला असून अभिषेकने देशात 637 वा क्रमांक पटकावला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com