आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी

आमदार काळे यांनी घेतली पदाधिकार्‍यांची बैठक
आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शिवसेना (Shivsena), काँग्रेसनंतर (Congress) आता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी (Municipal elections) राष्ट्रवादीने (NCP) देखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीची (Election) रणनीती ठरवण्यासाठी आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी राहाता (Rahata) येथील संपर्क कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक (Meeting) पार पडली. आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी प्रथमत: पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

राहाता (Rahata) शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ (City President Nandkumar Sadafal) यांच्या नेतृत्वाखाली राहाता (Rahata) शहरातील सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत सदर बैठक (Meeting) आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शहरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकी (Municipal elections) संदर्भात आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh kale) यांनी मोलाचे मार्गदर्शन व सूचना कार्यकर्त्यांना केल्या. आगामी निवडणुकीतील रणनीती ठरवण्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या.

शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, भागवत आरणे, निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, जिल्हा युवकचे सरचिटणीस रणजीत बोठे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस शेखर जमधडे, शहर उपाध्यक्ष समीर बेग, युवकचे जाईदभाई दारुवाले, योगेश निर्मळ, शशिकांत कुमावत, राहुल कुमावत, अभिजित बोठे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com