भोकर (वार्ताहर) -

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परीसरात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर काल बुधवार दि. 6 जानेवारी रोजी रात्री अचानक झालेल्या

अवकाळी पावसाने शेतकर्यांचे कुठलेही नूकसान झाले नसले तरी परीसरातील ऊस तोडणी कामगारांची मोठी धांदल उडाली असून या पावसाने या मजूरांचे सरपण भिजल्याने या महिलांना मोठा मनस्ताप होताना दिसत आहे. या दरम्यान खंडीत झालेला विजपुरवठा रात्री उशीराने पुर्ववत करण्यात आला.

परिसरात गेल्या आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण घटले होते. मात्र त्याचबरोबर शेतकर्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या ढगाळ वातावरणामुळे हरबर्यांसह पिंकावर किटकांचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या मार्गावर होता. मात्र काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कुठलेही वादळ, वारे नव्हते. ढगही जेमतेम होत तरीही अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचे कुठेच नुकसान झाले नाही. उलट या पावसामुळे पिकांवरील रोगराई धुवून जावून उभी पिके बहरणार आहेत. तसेच या पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढणार असल्याने या थंडीचा फायदा गहु व हरबरासारख्या पिकांना होणार यांत शंका नाही.

तर दुसरीकडे सध्या ऊस तोडणीचा हंगाम तेजीत असल्याने शेतात, पाड्यावर ऊस तोडणी मजुरांची मात्र चांगलीच धांदल उडाली. काही मजूरांचे सरपण भिजल्याने आता अन्न कसे शिजविणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचबरोबर या मजूरांच्या तांड्यावरील काही मजूरांना या पावसाचा चांगलाच मनस्ताप झाल्याचे दिसत आहे.