वीरगाव (वार्ताहर) -

बंगालच्या उपसागरावरून येणारे पुर्वेकडील वारे, त्यामुळे वाढलेली आर्द्रता आणि त्यामुळे तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे

अकोले तालुक्यातील आढळा परिसरात ढगांचा गडगडाट सुरू झाल्यावर शेतकरी धास्तावून गेले.

गुरुवारी सायंकाळी 5 वा. अचानक आकाशात ढगांनी गर्दी केल्याने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता गृहित धरून रब्बी हंगाम हातातून जाण्याच्या भीतीने शेतकरी गांगरून गेले. टाहाकारी, केळी या गावांमध्ये गारपीट होऊन गहू, हरभरा, उन्हाळी कांद्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. समशेरपूर, सावरगाव पाट परिसरातही पावसाचा उभ्या पिकांना तडाखा बसला. देवठाण, वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव आणि इतरही गावांत पावसाने रब्बी हंगामाचे नुकसान केले.

गहू, हरभरा, उन्हाळी कांदा या पिकांची पावसामुळे नुकसानीची मोठी शक्यता असल्याने उत्पादनावर मोठाच परिणाम होईल. नव्या वर्षात 10 जानेवारीच्या मुसळधार पावसात डाळिंबाची फुलगळ होऊन शेतकर्यांना चांगलाच तडाखा बसला होता. त्यातून सावरण्याआधीच नव्याने आलेले फुलं काही ठिकाणी या पावसात पुन्हा गळून गेले. काढणीला आलेल्या द्राक्ष फळांनाही तडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.