
पाथर्डी | Pathardi
पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील पुर्व भागात शुक्रवारी सांयकाळी व रात्री मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला.
पावसाचे प्रमाण जरी अल्प असले तरी वीटभट्टी चालक, फळबागा धारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी रात्री साधारणपणे सात ते साडेदहाच्या दरम्यान सोसाट्याच्या वारा व मोठ्या प्रमाणात विजाच्या कडकडाटासह पावसास सुरवात झाली.
राञीच्या अकरानंतर सोसाट्याच्या वाऱ्याने आंबा पिकाचे प्रचंड नुकसान होऊन लागलेली फळे गळून गेली आहे अशी माहिती फळबाग शेतकरी विजय जोशी यांनी दिली.