अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसह मेंढपाळांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसह मेंढपाळांचे मोठे नुकसान

पारनेर l तालुका प्रतिनिधी

अवकाळी पावसाचा व गारपिटीचा पारनेर तालुक्याला मोठा फटका बसला असुन शेतकऱ्यांसह मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.

पारनेर तालुक्यातील अनेक गावांना गेल्या चोवीस तासात अवकाळी अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. एकीकडे शेतातील पिकांचे नुकसान होत असतानाच मोठ्या प्रमाणात पशुधन दगावलेले आहे.

पारनेर तालुक्यात मेंढपाळ समाज मोठ्या संख्येने खेडोपाडी आणि डोंगर-दर्यात वास्तव्यास आहे. या भागातील अनेक गावांत अतिवृष्टीच्या माऱ्यामुळे पाचशेच्या वर मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असल्याचे बोलले जाते. प्रशासनाकडून मात्र अजून मृत पशुधनाची आकडेवारी दिलेली नसून पंचनामे सुरू असून मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याचे सांगण्यात आले.

याबाबात लोकनेते निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेचे यांनी सांगितले की, अनेक गावांत कुठे वीस, कुठे तीस तर कुठे पन्नासवर मेंढ्या अतिवृष्टीने मृत्युमुखी पडल्या आहेत. तहसीलदार आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन पाहणी करत आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून मेंढपालांना आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून शासकीय मदतीची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या गावात अतिवृष्टीचा तडाखा आणि पशुधनाचे नुकसान

रांधे, पाडळी आळे ,पळवे, पोखरी, वारणवाडी, पठारवाडी, कुरुंद, म्हसोबाझाप, खडकवाडी, वनकुटे, चोंभूत, शिरापूर, कातळवेढा पारनेर (तिरकळ मळा) पुणेवाडी, पारनेर (पुणेवाडी फाटा), पारनेर (सोबलेवाडी), किन्ही

आमदार लंकेचे कार्यकर्त्यांना आवाहन

पारनेर नगर मतदार संघात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी व मेंढपाळ बंधुचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा संबधीत व जवळील कार्यकर्तेनी नजिकच्या तलाठी ग्रामसेवक, मंडल अधिकारी यांना कळवून संबधीत घटनेचे पंचनामे करावयास लावने जेणेकरुन नुकसान ग्रस्तांना लवकर मदत मिळेल असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना केले आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com