शेतकऱ्यांची खरीपाच्या संकटानंतर अवकाळीमुळे रब्बीची पिकेही संकटात

शेतकऱ्यांची खरीपाच्या संकटानंतर अवकाळीमुळे रब्बीची पिकेही संकटात

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहता तालुक्यातील (Rahata Taluka) पिंपरी निर्मळ परिसरात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व जोरदार वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे (Rabbi Crops) मोठे नुकसान झाले आहे. खरिपाच्या नुसकान भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नसतानाच बळीराजा रब्बीच्या तडाक्यात पुन्हा सापडला आहे. कांद्याबरोबर शेतमालाचे पडलेले भाव व खरीप रब्बीत पावसामुळे होणारे नुकसान याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष (Administration Ignore) यामुळे बळीराजाला सुलतानी संकटाबरोबरच आसमानी संकटालाही तोंड द्यावे लागत आहे. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावी अशी मागणी होत आहे.

गणेश परिसरातील पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) परिसरात गेल्या खरिपात चांगला पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके चांगली आली होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने विक्रमी बरसात केल्यामुळे सोगनीस आलेल्या सोयाबीन पिकाचे (Soybean Crop) मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाकडून संबंधित नुकसानिचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. मात्र त्या गोष्टीला जवळपास चार महिने उलटूनही शेतकऱ्यांना आजपर्यंत प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही.

शेतकऱ्यांनी कर्ज पाणी काढून रब्बीची पिके उभी केली होती.मात्र काल झालेल्या अवकाळी पाऊस व प्रचंड वाऱ्यामुळे सोगंनीस आलेल्या गहू मका या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हरबरा पिकालाही फट का बसला आहे. कांद्याचे पडलेले भाव सोयाबीनच्या भावातील घसरगुंडी यामुळे शेतकरी आदेश धास्तावलेला आहे.त्यातच खरीपानंतर पुन्हा रब्बीतही अवकाळी पावसाने पिकांचे झालेल्या मस्काण्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे बळीराजाला सुलतानी संकटाबरोबरच आसमानी संकटालाही तोंड द्यावे लागत आहे. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com