तांत्रिक कारणामुळे ‘अवकाळी’ नुकसानीचे पंचनामे थांबवू नका

पालकमंत्री विखे यांच्या सुचना || चारा उत्पादनाचे नियोजन करण्याचे आदेश
राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील

पारनेर |प्रतिनिधी| Parner

गारपीट आणि अवकाळी पावसाने नूकसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत. तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, चारा उत्पादनासाठी नियोजन करा, अशा सूचना महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या. मदत करण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही आशी ग्वाही त्यांनी पाहाणी दौर्याच्या निमिताने दिली.

पालक मंत्री ना. विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यतील गांजीभोयरे येथील एकनाथ खोदडे यांच्या नूकसान झालेल्या कांदा पिकाची पाहाणी केली. गारपीटीने नूकसान झालेल्या महादू बापुराव आढाव यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेची पाहाणी करुन माहीती घूतली.ड्रगन फ्रूटाचा बाग आता पूर्णपणे गेला असून तो उभारणीसाठी पुन्हा दोन ते अडीच लाख रुपये लागणार असल्याची कैफीयत त्यांनी मंत्र्यापुढे मांडली. त्यांच्याच काढणीला आलेल्या द्राक्ष बागेच्या नूकसानीची माहीती घेवून मदतीबाबत मंत्र्यांनी त्यांना आश्वासित केले. झालेल्या नुकसानीची पाहाणी करून शेतकर्‍यांना दिलासा दिला. शेतकरी महीला यांनी सांगितलेल्या समस्या जाणून घेतल्या.प्रामुख्याने जनावारांच्या चार्‍याचा प्रश्न बिकट झाला असल्याचे महीलांनी निदर्शनास आणून त्यांनी जिल्हाधिकारी तसेच अन्य विभागाच्या अधिकार्‍यांना या समस्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने सर्वाधिक नूकसान झालेल्या भागाची पाहाणी करत असलो तरी इतरही तालुक्यात नूकसान झालेल्या पिकांचे शंभर टक्के पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे, तांत्रिक कारणाने पंचनामे थांबणार नाहीत. पंचनाम्याच्या अहवालानंतरच मदतीबाबत शासन निर्णय करेल, असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले, यापुर्वी सुध्दा सरकारने आशा नैसर्गिक संकटात सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना भरिव मदतीची केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका बजावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या संकटात सुध्दा एनडीआरएफच्या निकषाप्रमाणेच शासन मदत करण्याबाबत सकारात्मक असून दोन हेक्टरची अट शिथिल करून तीन हेक्टरपर्यत मदत करण्याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे. राज्यातील नूकसानीची संपूर्ण माहीती समोर आल्यानंतर मदतीबाबत निर्णय होईल असे मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. झालेले नूकसान भरून येवू शकत नाही, पण या आपत्तीमध्ये सर्वाधिक प्रश्न चार्‍याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेवून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यांच्यावतीने चारा उपलब्ध करून देण्यात आला असून यामध्ये अधिकची वाढ करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. चारा उत्पादनासाठी शेतकर्‍याना बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने यापुर्वी घेतला असून जिल्ह्यात चारा उत्पादनासाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन करून आराखडा तयार करावा तसेच मूर घास उत्पादन होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी दिले.

मंत्री विखे पाटील यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्णासाहेब हजारे यांचीही राळेगणसिध्दी येथे भेट घेतली. उपाय योजनाबबात त्यांच्याही सूचना त्यांनी जाणून घेतल्या. प्रामुख्याने दूध दराबाबत झालेल्या चर्चेबाबत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहीती विखे पाटील यांनी दिली. दूध भेसळ रोखण्यासाठी शासन कठोर कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर कृषी अधिकारी सुधाकर बोराळे पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुनिल तुंभारे यांच्यासह स्थानिक अधिकारी तसेच भाजपाचे तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com