आज-उद्या अवकाळीचे संकट

आज-उद्या अवकाळीचे संकट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उत्तर तमिळनाडू ते कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पश्चिम बंगाल ते ओडिशा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. मध्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वार्‍याची स्थिती आहे.

यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणार्‍या वार्‍यामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. नगर जिल्ह्याला 16 आणि 17 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पावसाचे अलर्ट -

गारपिटीसह पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com