अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांअर्तगत नगर शहर वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबवून दोन दिवसांमध्ये 785 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून

दोन लाख 26 हजार 300 रूपये दंड वसूल केला असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दिली.

32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहन चालकांविरूद्ध कारवाईची विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात येत आहे. यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी काम करीत आहे. वेगात वाहन चालवने, ट्रिपल सीट, विना नंबर, विना हेल्मेट, नो इंन्ट्री, विना सिटबेल्ट असा वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.

शुक्रवारी एसपी चौकात पोलिसांनी विशेष मोहिम राबवून 358 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून 93 हजार 300 रूपये दंड वसूल केला. तर शनिवारी पत्रकार चौक, मार्केयार्ड चौक येथे 427 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून एक लाख 33 हजार रूपये दंड वसूल केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात ही मोहिम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे निरीक्षक देवरे यांनी सांगितले.