कोपरगाव पालिकेत विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

कोपरगाव पालिकेत विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

पालिकेत गुरूवारी झालेल्या विषय समिती निवडीत भाजपा - शिवसेना यांचे बहुमत असल्याने सभापतींच्या निवडी बिनविरोध

झाल्या आहेत. पालिकेच्या सभागृहामध्ये विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी काम पाहिले यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थित होते .

कोपरगाव पालिका सभापती निवड प्रक्रियेत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. पालिकेत भाजप सेनेची सत्ता होती. सत्तेत शिवसेनेला सामावून घेण्यात आलं. बांधकाम सभापतिपदी भाजपचे संजय कारभारी पवार यांची निवड झाली.

पाणीपुरवठा सभापती पदावर सुवर्णा विवेक सोनवणे यांची निवड झाली. याशिवाय शिक्षण मंडळ सभापती शिवसेनेचे योगेश तुळशीदास बागुल यांची तर महिला बालकल्याण सभापती पदावर भाजपच्या हर्षा दिनेश कांबळे यांची निवड झाली. तसेच स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य सभापती पदावर भाजपाचे शिवाजी आनंदा खांडेकर यांची निवड करण्यात आली, नियोजन व विकास समिती पदावर उपनगराध्यक्ष स्वप्नील शिवाजी निखाडे यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती सभापती नगराध्यक्ष विजय सूर्यभान वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील शिवाजी निखाडे, संजय कारभारी पवार, योगेश तुळशीदास बागुल, शिवाजी आनंदा खांडेकर, सुवर्णा विवेक सोनवणे, हर्षा दिनेश कांबळे, रविंद्र नामदेव पाठक, ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई, मंदार सुभाष पहाडे यांचा समावेश आहे.

कोपरगाव नगरपालिकेमध्ये संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सभापतींची निवड केली. निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांनी सभापती तर सभा अधीक्षक म्हणून ज्ञानेश्वर चाकणे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे आणि सर्वच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. नगरपालिकेतील वेगवेगळ्या विभागाच्या सभापतिपदी नेत्याची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com