लष्करी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीकडून लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य

लष्करी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीकडून लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य

अहमदनगर | प्रतिनिधी

शहरातील १३ वर्षाच्या मुलासोबत प्रौढ व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटनासमोर आली. विशेष म्हणजे, मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणारी ही व्यक्ती लष्करी गणवेश परिधान केलेली होती, असे तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे. नगर शहराच्या सावेडी उपनगरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल रोडवर ही घटना बुधवारी घडली आहे.

१३ वर्षाचा हा अल्पवयीन पीडित मुलगा सायकलीवरून घराकडे चालला होता. त्यावेळी लष्करी गणवेश परिधान केलेल्या आणि रस्त्याने चाललेल्या या अनोळखी व्यक्तीने त्याला थांबविले. मुलाला थांबविणारे ही व्यक्ती प्रौढ होती. "मै आर्मीवाला हू", असेही सांगितले. येथील गॅरेजवर गाडी दुरुस्तीचे काम चालू असल्याचेही बतावणी त्याने केली. येथे लघुशंका करू शकतो का, अशी विचारणा केल्यावर मुलाने हो, म्हणून सांगितले. त्यावर लष्करी गणवेश परिधान केलेले त्या प्रौढ व्यक्तीने मुलाच्या हातातील सायकल हिसकावून घेत ती खाली पडली आणि मुलाला रस्त्याकडेला असलेल्या काटवनात घेऊन गेला. तिथे त्या व्यक्तीने मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची वाच्यता कुठे केल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शंभर रुपये देत तेथून ही व्यक्ती पसार झाली, असे मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

लष्करी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने लहान मुलांबरोबर केलेल्या अनैसर्गिक कृत्याने नगर शहरात खळबळ उडाली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. प्रभारी शहर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, निरीक्षक ज्योती गडकरी यांनीही घटनास्थळी पाहणी केली. ही अनोळखी व्यक्ती कोण असेल, याचा शोध तोफखाना पोलीस घेत आहेत. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी भादवि ३७७, अनैसर्गिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच लैंगिक गुन्हापासून बालकांच्या संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com