अल्पवयीन बहिण-भावासोबत युवकाचे अनैसर्गिक कृत्य

उपनगरातील घटना : अत्याचारा गुन्हा दाखल
अल्पवयीन बहिण-भावासोबत युवकाचे अनैसर्गिक कृत्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवकाने (वय 17) अल्पवयीन भाऊ-बहिणीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील उपनगरात घडली आहे. पीडित भाऊ-बहिणीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून युवकाविरूध्द अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली असून याबाबत रविवार, 11 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

उपनगरात राहणार्‍या फिर्यादी यांना सहा वर्षाचा मुलगा व आठ वर्षाची मुलगी आहे. ते दोघे शाळेत जातात. 27 ऑगस्ट रोजी शनिवार असल्याने फिर्यादीच्या मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने ते घरीच होते. दुपारी युवकाने फिर्यादीच्या मुलांना विश्‍वासात घेवून त्यांना क्लास घेतो असे सांगून त्याच्या राहत्या घरी बेडरूममध्ये बोलवून घेतले होते. सुरूवातीला मुलीला बेडरूममध्ये ठेवून मुलाला बाहेर काढून दिले. मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. यानंतर मुलाला बेडरूममध्ये बोलून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.

कोणाला काही सांगितल्यास तुमच्यासह तुमच्या आईला मारून टाकेल, अशी धमकी दिली होती. दरम्यान शनिवारी, 10 सप्टेंबर रोजी रात्री तो युवक फिर्यादीच्या घरी त्यांच्या मुलांना बोलावयला आला. परंतू फिर्यादीच्या मुलांनी त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. फिर्यादीने दुसर्‍या दिवशी रविवार, 11 सप्टेंबररोजी युवकासोबत न जाण्याचे कारण मुलांना विचारले असता त्यांनी 27 ऑगस्ट रोजी घडलेला प्रकार त्यांच्या आईला सांगितला. यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com