नेवासा पोलीस ठाण्यात विनापरवाना व्हिडीओ चित्रिकरण

कुकाण्याच्या तिघांवर गुन्हा दाखल
नेवासा पोलीस ठाण्यात विनापरवाना व्हिडीओ चित्रिकरण

नेवासा (तालुका प्रतिनिधी)

नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात अनधिकृतरित्या व्हिडीओ चित्रिकरण करत पोलीस कर्मचान्यास धक्का दिल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी पोलीस कर्मचारी गोवर्धन पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी आहे की कुकाणा दूरक्षेत्राच्या जागेवर असलेल्या अनधिकृत टपन्या हटविण्याच्या नोटिसा देऊन शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टपरीधारकांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस कर्मचारी अंबादास गिते, बाळासाहेब खेडकर, केवल रजपूत हे पोलीस ठाण्यात हजर होते. तेव्हा यावेळी १५ ते २० टपरीधारक पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या दालनात गेले असता त्यांच्या मागे अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षकांच्या दालनात गेले.

त्यावेळी पोलीस निरीक्षक पोवार हे टपरीधारकांना कायदेशीर सूचना देत असताना टपरीधारकांपैकी दोघेजण मोबाईलमध्ये विनापरवाना व्हिडीओ चित्रिकरण करत असताना तुम्ही कोणाचे शूटिंग काढत आहात?' अशी विचारणा पोलिसांनी केली असता या दोघांनी "तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? दूरक्षेत्राच्या जागेवरील आमच्या टपन्या काढणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा" अशी धमकी देत पोलीस कर्मचारी पवार यांना ढकलून दिले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेत ठाणे अंमलदारांच्या कक्षात आणले. त्यावेळी त्यांची नावे विचारली असता अन्सार अल्लीभाई इनामदार व बाळासाहेब रावसाहेब जावळे (दोघे रा. कुकाणा) असे सांगितले. त्यानंतर इनामदार व जावळे यांच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता सदर मोबाइलमध्ये पोलीस निरीक्षकांच्या कामकाजाचे शूटिंग केलेली दिसून आली. सदर व्हिडीओ कुणाच्या सांगण्यावरून काढला अशी विचारणा केली असता वसीम सुलेमान सय्यद (रा. कुकाणा) याच्या सांगण्यावरून काढला असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर मोबाइल पंचनामा करून जप्त करण्यात आले असल्याचे पोलीस कर्मचारी पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

अन्सार अल्लीभाई शेख, बाळासाहेब रा वसाहेब जावळे, वसीम सुलेमान सय्यद (सर्व रा. कुकाणा) या तिघांवर सरकारी कामात अडथळा, शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३, ७, ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com