विनापरवाना स्कॉर्पिओतून दारुची वाहतूक; एका जणाविरुध्द गुन्हा दाखल

विनापरवाना स्कॉर्पिओतून दारुची वाहतूक;
एका जणाविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

विनापरवाना एका स्कॉर्पिओ या कारमधून दारू घेऊन जात असताना पोलिसांनी येथील वॉर्ड नं. 6 मधील

साईबाबा मंदिराजवळील पुलावर त्यास पकडले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर येथील रोहित सूर्यकांत सगम हा त्यांच्या एमएच 17 एए 1829 या स्कॉर्पिओ कारमधून काल पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास 36 हजार रुपये किंमतीची मॅकडॉल कंपनीच्या 240 व्हिस्की दारू बाटल्या, 13440 किंमतीचे इम्पायर कंपनीच्या 144 व्हिस्की दारू बाटल्या, 2400 रुपये किंमतीच्या 96 व्हिस्की दारू बाटल्या, 4560 रुपये किंमतीच्या द बर्ग कंपनीच्या दारू बाटल्या अशी 77 हजार 500 रुपये किमतीची दारू, तसेच एमएच 17 एए 1829 या क्रमांकाची 6 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ कंपनीची कार गाडी असा एकूण 6 लाख 77 हजार 560 रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चंद्रकांत बारसे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रोहित सूर्यकांत सगम याचेविरुध्द भादंवि कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com