विनापरवाना हॅण्ड सॅनिटायझर बनविणारा जेरबंद

विनापरवाना हॅण्ड सॅनिटायझर बनविणारा जेरबंद

श्रीगोंदा पोलिसांची कारवाई; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

विनापरवाना हॅण्ड सॅनिटायझर तयार करून त्याची मेडिकल, रुग्णालयांना विक्री करणार्‍या एकाला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. विकास गुलाब तिखे (रा. काष्टी ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याकडून सॅनिटायझर बनविण्याच्या साहित्यासह दोन लाख 18 हजार 366 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. औषध निरीक्षक अशोक राठोड यांनी फिर्याद दिली आहे. काष्टी ते तांदळी जाणारे रोडवर शिक्षक कॉलनी जवळ पोलिसांनी ही कारवाई केली. शिक्षक कॉलनी जवळ एक जण विनापरवाना हॅण्ड सॅनिटायझर तयार करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक यांना माहिती कळवली.

त्यानूसार शिक्षक कॉलनी जवळ छापा मारला असता पत्र्याचे शेडमध्ये तिखे हा त्याच्या जवळ असणार्‍या ड्रम मधील द्रव्याचे मदतीने निळे पाणी व इतर सोलुशन मिक्स करुन हॅण्ड सॅनिटायझर तयार करताना, त्यास सॅनिटायझर बनविण्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान अवगत नसतांना व त्याअनुशंगाने सोबत कोणीही तज्ज्ञ नसताना सापडला. त्याच्याकडे सॅनिटायझर बनविण्याचे साहीत्य यामध्ये 200 लिटरचे प्रत्येकी 6 बॅरल, 35 लिटरचे 20 कॅन, 5 लिटरचे 109 कॅन, चंचुपात्र, नरसाळे, गाळण, प्रत्येकी 10 बॉटलचे तिन मोठे बॉक्स ज्यामध्य कलर डाय असलेल्या, वेगवेगळ्या फ्लेवर (सुगंधी) चार बॉटल, 50 मिलीच्या 25 स्प्रे बॉटल, स्टीकर, बिल बुक असे 2 लाख 18 हजार 366 रुपये किंमतीचे साहीत्य व साधन सामुग्री सापडली.

ही कामगिरी निरीक्षक ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरिक्षक राठोड, सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस कर्मचारी संभाजी शिंदे, प्रकाश मांडगे, दादा टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले, संतोष कोपनर, शरद चोबे, लता पुराणे यांनी केली कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com