विनापरवाना गॅस रिफीलींग

बोल्हेगावात पुरवठा विभागाची कारवाई
विनापरवाना गॅस रिफीलींग
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विनापरवाना व्यावसायिक वापराच्या गॅस टाक्यामधून (Gas Tanks) गॅस रिफीलींग (Gas Refilling) करून मशीनद्वारे वाहनांमध्ये गॅस (Gas) भरत असल्याचा बोल्हेगाव उपनगरातील (Bolhegav) प्रकार चव्हाट्यावर आला आहे. पुरवठा विभागाने कारवाई (Supply Department Action) करत एकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) केला आहे. आकाश बबन देशमुख (रा. बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल (Filed a Crime) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक जयंत कान्हु भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व पुरवठा निरीक्षक गिरीश गायकवाड बोल्हेगाव फाटा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये पहाणी केली असता आकाश देशमुख हा अनाधिकृतरित्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमधून मशिनच्या सहाय्याने गॅस काढून प्रवासी रिक्षा वाहनामध्ये बेकायदेशिरित्या गॅस (Gas) भरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी एक रिक्षा, 12 गॅस टाक्या, गॅस रिफीलींग मशीन, रबरी पाईप, वजनकाटा असा ऐवज जप्त (Seized) केला आहे. देशमुख विरोधात भादंवि कलम 285, 286, 336, जिवनावश्यक अधिनियम 1955 मधील कलम 3, 7 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस (MIDC Police) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com