अज्ञात चोरट्याने केली पाणबुडी मोटारींची चोरी

अज्ञात चोरट्याने केली पाणबुडी मोटारींची चोरी

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील तळेगाव दिघे (Talegav Dighe) गावांतर्गत असलेल्या हसनाबाद (Hasanabad) शिवारातून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शेतातील विहिरीतील दोन इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारींची (Electric submarine Pump) चोरी (Theft)

केल्याने शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दाखल फिर्यादीनुसार या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तळेगाव दिघे (Talegav Dighe) गावांतर्गतच्या हसनाबाद शिवारात विनायक गोपीनाथ कांदळकर व शिवाजी पिरताजी दिघे या शेतकर्‍यांच्या शेतात विहिरी आहेत. सदर शेतकर्‍यांच्या विहिरींतील इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारींची अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास चोरी केली. पाणबुडी मोटारींच्या चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर विनायक गोपीनाथ कांदळकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहेत. पाणबुडी मोटारींच्या चोरीच्या या घटनेने शेतकर्‍यांवर सावधान राहण्याची वेळ आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com