नागापूर शिवारात बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

नागापूर शिवारात बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

नेवासा | तालुका वार्ताहार

तालुक्यातील नागापूर शिवारात एका बेवारस मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. आज सकाळी (रविवार) सकाळी संबंधित घटना उघडकीस आली आहे.

खुणेगावचे कामगार पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हणुमंत दंरदले (रा.गंगापुर) यांनी फोन करुन कळविले की, एक पुरूष प्रेत वनविभाग खुणेगाव येथे दिसत आहे. त्यामुळे मी वनविभाग खुणेगाव -नागापुर येथे येवुन खात्री करुन पाहणी केली असता चरच्या बाजुला एक पुरुष जातीचे वय अंदाजे 60 ते 65 वर्षे हे कुजलेले दिसले त्याची त्वचा काळी पडलेली होती.

चेह-यावरील त्वचा निघुन जावुन फक्त जबडा दिसत होता. त्याचे अंगात पांढरे रंगाचा पायजमा शर्ट व निळसर पांढरे रंगाची अंडरपॅन्ट आणी काळे रंगाची बनियान /कोपरी, कंबरेला लाल रंगाचा करतुडा, उजवे हातात राखी बांधलेली, सदर प्रेताचे बाजुला झाकण उघडलेली विषारी औषधाची बाटली आणी दोन बुट,पांढ-या रंगाची टोपी, पिशवी पडलेली दिसत आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com