
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारत पाटील भुजाडी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या नामदार प्राजक्त तनपुरे पाटील चषक( राहुरी प्रीमियर लीग) या भव्य क्रिकेट स्पर्धेचा प्रथम विजेता युनिक्स पार्टनर्स ठरला आहे. या संघाने 71 हजार रुपयांचे पहिले बक्षीस व होंडा शाईन मोटार सायकल व चषक जिंकून स्पर्धेतील विजेतेपद मिळविले.तर उपविजेता लकी वॉरिअर्स संघ ठरला असून त्या संघास 51 हजार रुपये रोख व चषक व 5 ग्रॅम सोन्याची अंगठी मिळविली.
दि. 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2021 दरम्यान वायएमसी मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला. संघातील खेळाडू हे लिलाव पद्धतीने मार्गदर्शक भारत भुजाडी यांच्या मार्गदर्शना खाली निवडण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन राहुरी मर्चंट नागरी पतसंस्थेचे चेअरमन भारत भुजाडी, नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक बाळासाहेब उंडे, माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, नगरसेवक मुज्जू कादरी, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, नगरसेवक राहुल शेटे, सलीम शेख उपस्थित होते.
युनिक्स पार्टनर्स राहुरी व लकी वॉरियर्स राहुरी या दोन संघांमध्ये अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. ही लढत पाहण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी मॅचचा आनंद लुटत होते.
विजेते संघ पुढीलप्रमाणे स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 71 हजार रुपये व टू व्हीलर गाडी युनिक स्पार्टन राहुरी या संघाने मिळविली. द्वितीय पारितोषिक 51 हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी ही लकी वॉरियर्स संघाने मिळविली. तृतीय पारितोषिक 35 हजार रुपये व एलईडी टीव्ही श्रीराम दत्त संघाने मिळविली. चतुर्थ पारितोषिक पंचवीस हजार रुपये व रेसिंग सायकल दयावान इलेव्हन संघाने मिळविली. या स्पर्धेतील बेस्ट बॅटसमन मोसिन सय्यद मॅन ऑफ द सिरीज ठरला. नवोदित खेळाडू अभिजीत पागिरे बेस्ट आयकॉन मुन्ना शेख, बेस्ट आयडॉल योगेश कानडे, बेस्ट फील्डर कैलास गुंजाळ ठरला.
पारितोषिक वितरण राहुरी मर्चंट नागरी पतसंस्थेचे चेअरमन भारत भुजाडी, नगराध्यक्ष अनिल कासार, माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, नगरसेवक बाळासाहेब उंडे, नगरसेवक शहाजी जाधव, विलास तनपुरे, नगरसेवक मुज्जू कादरी, परेश सुराणा, दिलीप गोसावी, सौरभ उंडे, धनंजय म्हसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ओंकार कासार, आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी पार पडावी म्हणून राजूभाई शेख, रेलकर, मोसिन सय्यद, नागेश पवार, राहुल कसाब, इस्माईल शेख, बाबा बर्डे, कैलास गुंजाळ यांनी प्रयत्न केले.
अंतिम सामन्यात ना. प्राजक्त तनपुरे यांनी हजेरी लावली. पायाला मोठी दुखापत झालेली असून सुद्धा व हातामध्ये सलाईनसाठी लावलेले सिरींज तसेच घेऊन ते क्रिकेट मॅचचा आनंद घेत होते. खेळाडूंच्या प्रत्येक चौकार सिक्स व विकेट ला दाद देत होते. याप्रसंगी त्यांनी तालुक्यातील सर्व युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले.