शरीर, मन आणि भावनेच्या संयमासाठी योग महत्वाचा - ना. वैष्णव

शरीर, मन आणि भावनेच्या संयमासाठी योग महत्वाचा - ना. वैष्णव

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

भारत देशात योग पध्दत अत्यंत जुनी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात सर्वप्रथम 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा म्हणून मान्यता मिळविली. शरीर-मन आणि भावनेच्या संयमासाठी योग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.

भारतीय डाक विभागाच्यावतीने देशात योग साधना तळागाळात पोहोचली जावी यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले असुन यंदाचे वर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साईबाबांच्या शिर्डी पोष्टासह अन्य चार पोष्ट कार्यालयास योग प्रसाराचा मान मिळाला असुन त्याचे उदघाटन ऑनलाईन पध्दतीने केंद्रीय दुरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री देऊसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी प्रास्तविक करून योग साधनेबददल मार्गदर्शन केले. श्रीरामपूरचे डाक अधिक्षक हेमंत खडकेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिर्डी येथे साई मंदिराच्या प्रांगणात शताब्दी सभामंडपात श्रीरामपूर डाक विभागा मार्फत 25 एप्रील रोजी कर्मचार्‍यांनी सकाळी योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे काउंट डाऊन सुरु केले.

कार्यक्रमास साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, नवनाथ कोते, विश्वनाथ बजाज, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण विभाग प्रमुख अण्णासाहेब परदेशी, किशोर गवळी, सर्व डाक कर्मचारी, पुरकर व श्रीसाईबाबा संस्थान कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक संतोष जोशी, रविकुमार झावरे, विनायक शिंदे, शंकर राख, शिर्डीचे पोस्ट्मास्तर राजेश नेतनकर, चंद्रकांत देवरे, संजय वाघमारे, दिलीप भालेकर यांनी परीश्रम घेतले.

Related Stories

No stories found.