केंद्रीय मंत्री आठवले शिर्डीतून पुन्हा लोकसभा लढणार

शिर्डीत राष्ट्रीय अधिवेशन घेऊन रणशिग फुंकणार
रामदास आठवले
रामदास आठवले

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदार संघात पुन्हा 2024 ची निवडणूक लढवणार असून त्याचे रणशिग शिर्डीत पुढील महिन्यात राष्ट्रीय अधिवेशन घेऊन फुंकणार असल्याचे सूतोवाच आठवले यांनी पक्षाचे राज्यस्तरीय बैठकी अगोदर शिर्डीतील पत्रकार परिषदेत केले.

रामदास आठवले
अर्थसंकल्प राबवण्यासाठी पैसे कमी पडल्यास कर्डिलेंनी जिल्हा बँकेतून द्यावेत

रिपब्लिकन पक्षाची राज्यस्तरीय बैठक शिर्डीतील शांतीकमल येथे पार पडली. त्याअगोदर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका विषद केली. ते म्हणाले, माझी शिर्डी मतदार संघातून येणारी लोकसभा निवडणुक लढवण्याची ईच्छा आहे.त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. यावेळचे वातावरण चांगले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेबरोबर चर्चा सुरू आहे. येथील आमदार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजय विखे पाटील यांचेशी चर्चा करून उमेदवारीवर अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे.

रामदास आठवले
रंगपंचमीचा रंग बेरंग! शेततळ्यात पडून दोन लहानग्या भावांचा दुर्दैवी मृत्यु

मागिल वेळी जर स्व. बाळासाहेब विखे पाटील यांना दक्षिण लोकसभेचे जागा मिळाली असती तर शिर्डीतून निवडून आलो असतो. परंतु तसे न झाल्याने मला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु आता परिस्थिती वेगळी असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्वाखाली भाजप मित्र पक्षाची घौडदोड सुरू असून येत्या लोकसभेचे एनडीए च्या सुमारे चारशे जागा निवडून येतील व देशाच्या प्रधानमंत्री पदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होतील. शिर्डीकरासाठी मी पुन्हा येईल आता मात्र विजय निश्चित राहिल या करिता पंतप्रधान नरेद्र मोदी, अमित शहा, जी पी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखेशी चर्चा करणार आहे.

रामदास आठवले
195 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचना 17 मार्चला

राज्य सरकार दिड वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करणार असून सुप्रीम कोर्टातील निकाल एकनाथ शिंदे यांचे बाजूने लागणार आहे. पुन्हा शिवसेना भाजप युतीचे सरकार राज्यात येईल. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांचा विरोध केला त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं हाही शब्द प्रयोग त्यांनी टाळले पाहिजे. प्रदेशाध्यक्ष बावनकूळे हे जरी राज ठाकरे यांचेशी युती करण्याविषयी बोलत असले तरी केंद्रातील नेते तसे होउ देणार नाही. राज्य सरकारचा विस्तार झाल्यास एक मंत्रीपद व एमएलसी तसेच महामंडळाला दोन ते तीन अध्यक्ष व समित्यांवर कार्यकर्ते ना संधी मिळायला हवी तर लोकसभेसाठीदोन ते तीन जागा, विधानसभेला पंधरा जागेची मागणी करणार आहे.

रामदास आठवले
आदिवासी उमेदवारांनाच स्थानिक भरतीमध्ये संधी

तसेच यावेळी बहुजन समाजाला तिकिटे दिली जाणार आहे. तसेच ज्या जागेवर उमेदवार निवडून येतील त्याच जागा मागणार आहोत. नागालॅडमधे पक्षाचे दोन आमदार निवडून आले असल्याने पक्षाची ताकत वाढली असून महाराष्ट्रातही आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com