आपण बोलवत असाल तर नक्की विचार करेल - ना. आठवले

आपण बोलवत असाल तर नक्की विचार करेल - ना. आठवले

घारगाव |वार्ताहर| Ghargav

रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मनात शिर्डी लोकसभा मतदारसंघात 13 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाची सल कायम आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मी हारलो असलो तरी आपण मला बोलवत असाल तर पुन्हा नक्की विचार करेल, असे म्हणत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. आठवले म्हणाले, देशाला स्वतंत्र मिळून काळ झाला असला तरी अजूनही ग्रामीण भागात रस्ते होत नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून भोजदरी गावाकडे येणारा रस्ता डांबरी व्हावा यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. मुख्यमंत्री आणि आमचं सध्या फार जमत नाही मात्र जमत नसलं तरी तुमच्या रस्त्यासाठी जमून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी भोजदरी ग्रामस्थांना दिले.

‘माझ्या भीमाचे योगदान आहे माझ्या लाल बत्तीच्या गाडीला म्हणूनच मी आलोय तुमच्या भोजदरी वाडीला. जर कोणी हात लावला माझ्या दाढीला तर आग लाऊन टाकील त्याच्या माडीला’ असा शब्दात आठवले यांनी शेरोशायरी करत उपस्थितांची दाद मिळवली.

Related Stories

No stories found.