अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरूण ठार, एक गंभीर जखमी

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरूण ठार, एक गंभीर जखमी

पाथर्डी | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील सुसरे येथील दोन युवकांचा अपघातात जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अज्ञात वाहन व मोटरसायकल अपघाताची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अमरापुर- सुसरे रोडवरील म्हसोबा वस्ती नाजिक घडली असुन यामध्ये नामदेव बबन आठरे वय २८, विजय मारूती मिसाळ वय २२ रा.सुसरे असे अपघातात मृत झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर आदेश शेषराव कंठळी वय २१ हा गंभीर जखमी झाला असून खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

अपघातानंतर या तिघांना उपचारासाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच आठरे व मिसाळ यांचा मृत्यू झाला होता. अज्ञात वाहन व मोटरसायकल इतकी जोरदार धडक झाली की या अपघातात दोन्ही तरुण जागीच मृत पावले. मृत नामदेव आठरे या तरुणाला अवघ्या चार महिन्याची एक मुलगी आहे. या अपघातानंतर संपूर्ण सुसरे गावावर मोठी शोककळ पसरली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com