रोटाव्हेटरचा चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

रोटाव्हेटरचा चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील (Sangamner) ओझर खुर्द (Ozar Khurd) शिवारात शेतीची मशागत सुरु असताना ट्रॅक्टरच्या (Tractor) रोटाव्हेटरमध्ये (Rotavator) गुंतलेला चिखल (Mud) काढण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या (Youth) अंगावर रोटाव्हेटर (Rotavator) पडल्यामुळे त्याचा यामध्ये दुदैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.

रोटाव्हेटरचा चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
नगर-मनमाड महामार्गावर ट्रक व दोन दुचाकींचा भीषण अपघात

सोमवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ओझर खुर्द शिवारातील दत्तमंदिर परिसरात पुंजा धोडींबा शिंदे (वय 39) हा तरुण ट्रॅक्टरच्या (Tractor) सहाय्याने शेतीची मशागत (Cultivation of Agriculture) करत होता. यावेळी रोटाव्हेटरमध्ये (Rotavator) चिखल (Mud) गुंतल्यामुळे ट्रॅक्टर (Tractor) उताराला लावून तो रोटाव्हेटरचा (Rotavator) चिखल काढत होता. यावेळी ट्रॅक्टर सरकल्याने रोटाव्हेटर थेट त्यांच्या छाती व पोटावर पडला.

रोटाव्हेटरचा चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
कोश्यारी, त्रिवेदींना मिरचीची धुरी !

यावेळी स्थानिकांनी पाहिले असता त्याठिकाणी धाव घेतली. इतर स्थानिक नागरीकांच्या मदतीने पुंजा शिंदे यांना संगमनेर येथिल खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापुर्वीच त्याचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान मयत पुंजा शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, एक भाऊ, एक बहिण असा मोठा परिवार असून त्याची घरची परिस्थिती गरीबीची असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनाची वार्ता गावासह पंचक्रोशीत पसरातच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रोटाव्हेटरचा चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अडचणीत वाढ
रोटाव्हेटरचा चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘परफेक्ट बायको कशी शोधावी?’

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com