‘ओबीसी’चे राजकीय आरक्षण पूर्ववत करा

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयात
‘ओबीसी’चे राजकीय आरक्षण पूर्ववत करा

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - ओबीसी (Other Backward Class (OBC)) समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणारे 27 टक्के राजकीय आरक्षण (political reservation) त्वरित पूर्ववत करावे, यासह अन्य मागणीचे निवेदन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

यावेळी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, जिल्हा अध्यक्ष नितीन शेटे, अनिल भाताबरे, दत्तात्रेय भाताबरे, चंद्रकांत काटकर, सोमनाथ जंगम, अक्षय कोरे, शुभम पखाले, सुनील शेटे, विशाल जंगम, शिवकुमार डोंगरे, संतोष सबळे आदी उपस्थित होते.

ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मिळणारे 27 टक्के राजकीय आरक्षण त्वरित पूर्ववत चालू करण्यात यावे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी समाजाचे 27 टक्के राजकीय आरक्षण पूर्ववत चालू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, व राज्य सरकार मधील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या पदोन्नतीसाठी ओबीसीसह एससी व एसटी यांचे हक्काचे एकूण 52 टक्के आरक्षण लागू करून कर्मचार्‍यांची पदोन्नती करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com