उंदीरगावच्या सरपंच, उपसरपंचांना कार्यालयात कोंडले

कामे होत नसल्याने विरोधी सदस्यांचे आंदोलन
उंदीरगावच्या सरपंच, उपसरपंचांना कार्यालयात कोंडले

शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील उंदीरगाव (Undirgav) येथील विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी (Gram Panchayat members of the opposition group) विविध मागण्यासाठी उंदीरगाव ग्रामपंचायत (Undirgav Grampanchayat) कार्यालयात सरपंच (Sarpanch), उपसरपंच (Sub Sarpanch) यांना बाहेरून कुलूप लावून कोंडून घेतले. अशोक सहकारी साखर कारखान्याचे (Ashok Co-operative Sugar Factory) माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय (Grampanchayat Office Open) उघडण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके व योगीता निपुंगे यांनी उंदीरगाव ग्रामपंचायतीत कोणतेच काम वेळेवर पूर्ण होत नाही. तसेच केलेले काम हे चांगल्या दर्जाचे नाही. महिन्यापासून ग्रामस्थांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. चार महिने मशीन बसविले पण सुरू केले नाही. सार्वजनिक शौचालय 5 महिन्यांपासून बांधूनही नागरिकांना वापरण्यासाठी खुले केले नाही. या मागण्यांसाठी कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी सरपंच सुभाष बोधक व उपसरपंच रमेश गायके हे लिपिक कार्यालयात असताना कोंडले गेले.

अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले. या आंदोलनप्रसंगी दिलीप गलांडे, बाळासाहेब घोडे, अमोल नाईक, किशोर नाईक, मनोज बोडखे, बाळासाहेब निपुंगे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com