
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील उंदिरगाव येथे आ. लहू कानडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात राबविलेल्या गावोगावी काँग्रेस मोहिमेत उंदिरगावच्या काँग्रेस कार्यकारिणीचा फलक लावण्यात आलेला होता. त्या फलकाची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
आ. लहू कानडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात राबविलेल्या गावोगावी काँग्रेस मोहिमेत उंदिरगावच्या काँग्रेस कार्यकारिणीचा फलक लावण्यात आलेला होता. सदर फलकाचे अनावरण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर काँग्रेस कार्यकारिणीचा फलक अज्ञात व्यक्तींकडून मंगळवारी रात्री तोडण्यात आलेला आहे. तसेच दोन सिमेंट बाकड्यांची सुद्धा मोडतोड करण्यात आली.
हा प्रकार रात्री दोन वाजेनंतर घडल्याचे समजले. या फलक तोडफोड कृत्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आमदार यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या अशोक कारखाना निवडणुकीमुळे फलक मोडतोड केली असावी, अशी चर्चा आहे.