नबाब मलिकांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत ?

नबाब मलिकांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत ?

लोणी |प्रतिनिधी| Loni

मुंबईसह (Mumbai) राज्याला असुरक्षित करणार्‍या व्यक्तींसमवेत आर्थिक लागेबांधे उघड झाल्यानंतरही मंत्री नबाब मलिक (Minister Nawab Malik) यांचा राजीनामा (Resigned) न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत? असा सवाल भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला.

मंत्री नबाब मलीक (Minister Nawab Malik) यांना अटक (Arrested) झाल्यांनतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी (Demand) भाजपाच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यानी मौन पाळले याचे आश्चर्य वाटत असल्याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, 1993 साली मुंबईत (Mumbai) झालेल्या बॉम्बस्फोटाच्या (bombing) वेदना अद्यापही कायम आहेत. असंख्य निरापराध माणसे मृत्यूमुखी पडल्याच्या स्मृती विरलेल्या नाहीत. या घटनेशी संबंध असलेल्या व्यक्तींशी मंत्री नबाब मलिक (Minister Nawab Malik) यांचे मनी लाँडरींग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक झाली तरीही मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नसतील तर देशहिताची ही प्रतारणाच म्हणावी लागेल, असे विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे एक एक कारनामे उघड होत आहेत. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सहभागामुळे राजीनामा घेणारे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते नबाब मलिकांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत पाठराखण करीत असल्याकडेही आ. विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर नेमका कोणाचा दबाव आहे? नबाब मलिकांचे बॉम्बस्फोटातील आरोपीशी उघड झालेल्या आर्थिक संबंधांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. अशा लोकांना बरोबर घेवून शिवसेना राज्य करणार का? असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाने मंत्री नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. यासाठी आंदोलन सुरू केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजपासून रस्त्यावर उतरले आहेत. नबाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाला इशाराही आ. विखे यांनी दिला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com