आ. विखेंच्या नेतृत्वात लोणीत आंदोलन
सार्वमत

आ. विखेंच्या नेतृत्वात लोणीत आंदोलन

भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

Nilesh Jadhav

लोणी | वार्ताहर | Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आज सकाळी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आ. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या, १० रुपये लिटर अनुदान द्या अशी मागणी केली आहे.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, विकास संस्थेचे अध्यक्ष चांगदेव विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, सुभाष विखे, किसनराव विखे, संपतराव विखे, मुरलीधर विखे, नाना म्हस्के, वसंतराव विखे, अशोक धावणे, बाळासाहेब वाबळे, भाऊसाहेब विखे, बद्री विखे, नवनीत साबळे, सचिन विखे, विकास म्हस्के, काशिनाथ म्हस्के, संतोष विखे, संजय म्हस्के आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com