
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीतील (Shirdi) हॉटेल साईश चौकात गर्दीच्या ठिकाणी भरधाव वेगाने अनियंत्रित झालेल्या चारचाकी मॅक्स वाहनाचा थरार (Car Accident) पाहून नागरिकांची व साई भक्तांची (Sai Devotee) मोठी धांदल उडाली.
मंगळवारी रात्री साईबाबांची आरती संपल्यानंतर साई भक्त साईश चौकात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये भोजन करत असताना अचानक एक चारचाकी वाहन (Car) साई मंदिराकडून रिव्हर्स गियर टाकत जोराने अतुल गोंदकर यांच्या रेस्टॉरंट्कडे आले. तेथून पुन्हा जोरात वाहन (Vehicle) गोल गोल वळवत थेट आर के पंजाबी रेस्टॉरंट समोरील चायनीजच्या काउंटरला जोरदार धडक दिली. त्यानंतर पुन्हा गाडी वळवत कालिका नगर कडे जोराने गेल्याने नागरीकांमध्ये मोठी धांदल उडाली.
रस्त्याने जातांना सदर वहानाने अनेक दुचाकी धारकांना कट मारत पाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चायनीज काउंटरला दिलेली धडक जोरदार होती. स्टीलचे काउंटर कोलमडून पडले आणि तेथे असलेली सिलेंडर टाकी सुद्धा या धडकेत चेपल्याने मोठा अनर्थ टळला. या धडकेत वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. परंतु सदैव कुठलीही जीवितहानी झाली नाही. कालिका नगर येथे चालक गाडी सोडून पसार झाला.
जमावाने गाडीच्या काचा फोडत रोष व्यक्त केला. जमावाने गाडीच्या चारही बाजूचा काचा फोडून टाकल्या तर त्या वाहनाच्या दर्शनी भागात बोनेट वर चायनीज नुडल्स आणि चटणी तशीच दिसून येत होती. सदर प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालं असून सदर वाहन चालक कोण याचा तपास शिर्डी पोलिस करीत आहे.