सुपा |वार्ताहर| Supa

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची संकल्पना खूप चांगली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी

मी आ. निलेश लंके यांचा प्रचारक म्हणून काम करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे कार्यकर्ते व प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले.

दरम्यान, पद्मभूषण हजारे यांची कर्मभूमी व ग्रामविकासाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अण्णा व आ. लंकेच्या प्रयत्नांना यश आले आहे. हजारे व आ. लंके यांनी तालुक्यातील जास्तीत-जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यासाठी आवाहन केले होते.

बिनविरोध निवडणुकांमुळे गावागावांत वाद होणार नाहीत. अनावश्यक खर्च टळले जाऊन सामोपचाराने विकास कामे होतील हा त्यामागचा उद्देश आहे. यासाठी आ. लंके यांनी तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांना सुरूवात केली आहे. त्याअनुषंगाने नुकतीच सुपा जि. प. गटातील काही गावांच्या बैठका झाल्या.

शनिवारी राळेगणसिद्धी येथे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांशी आ. लंके यांनी चर्चा केली. यावेळी दोन्ही गट एकत्र येऊन सामोपचाराने जागा वाटप करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, सुरेश पठारे, दत्ता आवारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, यापूर्वीच आ. लंके यांनी मतदारसंघातील जनतेला आवाहन करत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा व गावाला 25 लाख रुपये निधी मिळवा, असे आवाहन केले होते. या आवाहनाचे हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांनी स्वागत केले होते. तद्नंतर शनिवारी हजारे यांनी राळेगणसिध्दीमध्ये ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकाची संकल्पना खूप चांगली असून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी मी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून काम करणार असल्याचेे कार्यकर्ते व प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले.